(छायाचित्र - मनोज मेहता)
आपली चूल वेगळी मांडायची, एकसंध समाज म्हणताना अनेक तुकड्यांनी हा समाज बनलेला असल्याच्या खुणा जागोजागी मिरवायच्या, इतर घटकांचं काही का होत असेना आपण आपल्याच मस्तीत रहायचे या आणि यासारख्या हिंदुंच्या विस्कळितपणाच्या जागा नववर्षाच्या शोभायात्रेमध्ये असंख्य दाखवता येतील. सिकंदराने किंवा मोगलांनी किंवा अन्य परकीय आक्रमकांनी ज्या ज्यावेळी भारतावर आक्रमणे केली, त्या त्यावेळी हजारोंच्या संख्येने विस्कळित असलेली राज्ये, संस्थाने लढाया करत होती आणि पराभूत होत होती. चाणक्य, थोरला बाजीराव आणि ब्रिटिशांच्या विरोधात काँग्रेसने एकत्र केलेला भारतीय समाज असे मोजके अपवाद वगळता हिंदू किंवा एकूणात भारतीय समाजाचा व्यवहार विस्कळितपणाचाच राहिलेला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे स्वागत यात्रेच्या माध्यमातून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याचा जबरदस्त पायंडा पाडल्याला १५ वर्ष झाली पण, त्यातही हा विस्कळितपणा जसाच्या तसाच राहिलेला आहे.
वानगीदाखल सांगायचं, तर ज्या डोंबिवलीने स्वागतयात्रेचा पायंडा पाडला आणि पाठोपाठ अनेक राज्यांमध्ये व विदेशांमध्येही ही संकल्पना रुजली त्याच डोंबिवलीमधली काय स्थिती आहे. तर ७०- ८० संस्शा आपापल्या गाड्या, कार्यकर्ते, संदेश, ढोल-ताशा, बँड असं काय काय घेतात आणि शहराच्या एका भागापासून ते दुस-या भागापर्यंत आपल्या संस्थेची रस्त्यावर जाहिरात करतात. अनेक लेझिम पथके, अनेक ढोल-ताशांची पथके, अनेक गणवेश, अनेक भजनी मंडळे हे कमी की काय म्हणून बँका नी व्यायामशाळांची जाहिरात करणारी पथके. बरं, एवढा सगळा विस्कळितपणा नी मिसळुनी सगळ्यातही रंग माझा वेगळा अशी वृत्ती जागोजागी दिसत असताना ही यात्रा शोभेपुरती राहिलीय म्हणायचं, नाहीतर काय म्हणायचं.
शंभराच्या घरामधील संस्था नी हजारो सहभागी स्वागतयात्रांमध्ये सामील होतात, त्यामुळं त्यांचं नियोजन करणं, वेगळं नावीन्यपूर्ण काहीतरी देणं कठीण गोष्ट आहे, परंतु त्या दिशेने किमान सुरुवात करायला हवी आणि काही साध्या-सोप्या गोष्टी तर ताबडतोब सुरू करायला हव्यात. साधं कपड्यांचं उदाहरण घेऊया. प्रत्येकजण लग्नाला आल्यासारखा ठेवणीतले कपडे घालून येतो किंवा त्या त्या संस्थेचा गणवेश घालतो. समजा पुरुषांनी पांढरा सदरा / झब्बा घालायचा आणि महिलांनी ठराविक रंगाची साडी वा ड्रेस घालायचा इतका एक साधा नियम आखून दिला तरी विचार करा एका क्षणात अख्खी यात्रा एकसंध दिसेल आणि ते दृष्य हा समाज एकत्र आहे याची खात्री पटवणारे असेल. प्रत्येक संस्थेचा वेगळे ढोल-ताशा पथक वा लेझीम पथक न करता त्यांचं एकत्रीकरण केले व एका सूत्रसंचालकाच्या दिग्दर्शनाखाली सगळे एकामागोमाग गेले तर केवढे भव्य व सुश्राव्य असेल ते दृष्य. होतं काय पाच-पाच दहा-दहा ढोल घेतलेली १०-२० पथकं असतात आणि ते काय वाजवतायत यांचा एकमेकांना काही पत्ता नसतो. हीच गत लेझिमपथकाची नी भजनी मंडळाची. एखाद्या कोप-यावर उभं राहून जर आपण ही यात्रा बघत असू तर ज्ञानोबा माऊली तुकारामची पहिल्या संस्थेच्या भजनाची ओळ कानावर पडते नी दुसरी ओळ नरेंद्र महाराज व अक्कलकोट महाराजांच्या भजनाची असते. प्रत्येकजण आपापले भोंगे नी कर्णकर्कश्श ध्वनीयंत्रणा घेऊन आलेला असतो नी आपल्याच विश्वात मश्गुल असतो, हिंदु समाजाचं खरंखुरं प्रतिबिंब दाखवत.
शोभायात्रा सुरू करण्याच्या दिशेनं पहिलं पाउल डोंबिवलीनं टाकलंय, एकसंध समाजाचं दर्शन घडवणारं दुसरं पाऊल कोण नी कधी टाकतं ते बघायचंय!
Thursday, April 11, 2013
विस्कळित हिंदुधर्माचे प्रतिबिंब पडणा-या शोभायात्रा

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment