इसापनीतीमध्ये एक कथा आहे... एका गावामध्ये दोन बैलांमध्ये झुंज लागलेली असते. दोन्ही बैल शक्तिमान असतात आणि एकमेकांना प्रचंड ताकदीने रेटत असतात. कधी एकाची तर कधी दुस-याची सरशी होत असते. तमाम प्राणीजन मोक्याच्या जागा अडवून हा मुकाबला बघण्यात मग्न असतो. शेताच्या बांधावर असलेल्या बिळांमधली बेडकाची दोन पिल्लं जराशी उंच जागा शोधत हा तमाशा बघण्याचा प्रयत्न करत असतात. काही वेळातच त्यांची आई येते नी म्हणते चला बाळांनो, जरा लांब जाऊ, इथं थांबण्यात धोका आहे. पिल्लं चित्कारतात... आई आम्हाला ही मारामारी बघायचीय, खूप मजा येतेय. अनुभवी बेडकीण उद्गारते, बाळांनो मस्तवाल बैलांच्या झुंजीत बळी जातो बेडकांचाच. त्यामुळे ऐका माझं आणि जरा लांब चला...
इसापानं जो शहाणपणा शिकवलाय, त्याचं प्रत्यंतर वेळोवेळी भारतीय समाजजीवनात येतं. कट्टर राजकीय विरोधक धंद्यातले भागीदार निघतात, लग्नसंबंधांने जोडलेले नातेवाईक निघतात तर अनेकवेळा नंतर एकाच पक्षात खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. गुंड आणि पोलीस यांच्याबाबत सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेली प्रतिमा म्हणजे ज्यांना गणवेश असतो ते पोलीस आणि नसतो ते गुंड. अनेक गुंड काळा गॉगल आणि पांढरे शुभ्र कपडे असा गणवेश आपखुशीने स्वीकारतात, पण ते काही बंधन नव्हे! पोलीस स्टेशनमध्ये पासपोर्टच्या कामासाठी गेलेल्या सर्वसामान्य माणसाच्याही मनात एकच भीती असते, ती म्हणजे खाकीतले हे गुंड आपल्याला आत नाही ना टाकणार? महिला तर कुठल्यातरी पुरुषाला सोबत घेतल्याखेरीज पासपोर्टच्या कामासाठी देखील पोलीस स्टेशनात जात नाहीत. गुंडांच्या नी राजकारण्यांच्यापुढे अजीजीने राहणारे पोलीस पापभिरू माणूस समोर असला की एकदम मर्द होऊन जातो आणि बायकोला देखील थप्पड न मारलेल्या त्या कॉमन मॅनला हा पोलीस आपल्याला बलात्काराच्या आरोपाखाली तर पकडणार नाही ना अशी भीती वाटते... हा सगळा एकंदर माहोल शाबूत असताना पोलीस अधिकारी सूर्यवंशी आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्यात झालेल्या राड्याने एक वेगळीच झुंज आपल्याला बघायला मिळाली.
मजा म्हणजे झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सर्वसामान्य माणसांना मनातून फार बरं वाटत होतं. पाकिस्तानला आपण नाही हरवू शकलो, पण ऑस्ट्रेलियाने त्यांना हरवल्यावर जसा वांझोटा आनंद आपल्याला व्हायचा. तसाच आनंद या पोलीस-आमदार हमरीतुमरीत लोकांना झाला. कारण दोघेही गुंड असल्याची सार्वत्रिक भावना आणि दोघेही एकत्रच असल्याचा समज यामुळे ज्यावेळी वृषभांचं प्रतिनिधीत्व करणारे हे दोन्ही पक्ष समोरासमोर ठाकले त्यावेळी जनतेची भावना मात्र दोन बैलांची झुंज बांधावर उभं राहून गंमत बघणा-या बेडकांचीच होती. गुंड आरडीएक्स पासून ते ड्रग्जपर्यंत त्यांना जे हवं ते हवं तिथे आरामात घेऊन जातात. त्यांना हवे ते उद्योग करतात आणि पोलीस मात्र सीटबेल्ट न लावल्याचं कारण देत सर्वसामान्य माणसांवर मग्रुरी दाखवतात. ठाकूरांच्या काळ्या काचांना हात लावण्याची धमक नसलेले पोलीस सामान्यांच्या काळ्या काचा भररस्त्यात उतरवायला लावतात आणि वर साहेब साहेब करत त्यांच्यामागे हां जी हांजी करायला लागते ही भावना सामान्यांच्या मनात सतत वास्तव्याला असते. अशा मग्रूर पोलीसांचं प्रतिनिधीत्व करणा-या सूर्यवंशींनी तोच तोरा आमदारांच्या बाबतीत दाखवला आणि बैलांचं प्रतिनिधीत्व करणा-या एका पार्टीचा डाव जड झाल्याचं बघून सामान्यांनी टाळ्या वाजवल्या.
दुस-या बैलांचं प्रतिनिधीत्व करणारी पार्टी काही सामान्य नव्हती. त्या पार्टीनं आपल्या जातीच्या काही बैलांचा पाठिंबा मिळवला आणि साक्षात विधीमंडळातच सूर्यवंशींची धुलाई केली. पारडं फिरलं, पण दुस-या बैलांनाही धडा मिळाल्याचं बघताच जनतेने पुन्हा टाळ्या पिटल्या. झुंज रंगात येत असल्याचं हे लक्षण होतं. सीसीटिव्हीचं फुटेज, बघ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि कायद्याचं राज्य असल्याची किमान ग्वाही देण्याचं कर्तव्य असल्याची भावना यामुळे या आमदारांच्या वर कारवाई झाली आणि चार दिवसांसाठी का होईना ते तुरुंगात गेले. आता भारतात बाँबस्फोट करून शेकडो लोकांना मारल्यावरही शिक्षा मिळायला दोन दशकं लागतात, त्यामुळे एका पोलीसाला मारलं तर त्याची शिक्षा जाहीर व्हायला किती शतकं लागतील हे काय सांगायला नको. त्यामुळे आमदारांची पार्टी सुशेगात आहे हे काय सांगायला नको.
पण या झुंजीमध्ये आता एक तिसरा कोन आलाय. आधी समोरासमोर असणारी ही झुंज मीडियाच्या प्रवेशानं तिन अंगी झाली. मीडिया म्हणजे जे काही घडतंय ते बातम्यांच्या माध्यमातून प्रसार करणारी माध्यमं, अशी एक भाबडी समजूत काही काळापूर्वीपर्यंत होती. पण आता ती समजूत लयाला गेलीय. मीडिया म्हणजे, ज्याच्या समोर कॅमेरा आहे किंवा ज्याच्या हातात पेन आहे - वृत्तपत्र आहे, जो स्वताला अभ्यासक म्हणवतो, तज्ज्ञ म्हणवतो आणि ज्याच्या खांद्यावर भारताची लोकशाही अबाधित ठेवण्याची धुरा आहे अशा पत्रकारांचा समूह म्हणजे मीडिया अशी नवीन व्याख्या आहे. हा समूह वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये विखुरलेला आहे. वरकरणी समोरासमोर स्पर्धा करणारा पत्रकारांचा हा कळप एकाच बाबतीत सामायिक आहे, ते म्हणजे जे काही कळतंय ते आपल्यालाच आणि आपल्या मते लोकशाहीत जे व्हायला हवं तेच भारताच्या भल्यासाठी आहे अशी दृढ भावना याबाबतीत या संपू्र्ण कळपाचं एकमत आहे. आपल्या चॅनेलवर वा कॉलममधून जे काही आपण बोलतोय तीच संपूर्ण राज्याची वा देशाची भूमिका असल्याचा आणि जनमत आपल्याच मुखातून बोलत असल्याचा जो दुर्दम्य आत्मप्रचितीचा हा जो काही अविष्कार आहे त्याला काही तोड नाहीये. आपल्याला घराचं पुढल्या आर्थिक वर्षाचं बजेट मांडा असं सांगितलं तर ज्यांना फेफरं येईल ते खुशाल अर्थमंत्र्यांनी देशाचं वाटोळं केलेलं आहे किंवा भारत २०२०मध्ये अमेरिकेला मागे टाकेल असं जेव्हा बोलतात, तेव्हा नुसत्या त्यांच्या अज्ञानाची कीव येत नाही तर सर्वसामान्य जनता यांना फॉलो करताना किती मूर्ख आहे हे ही लक्षात येतं आणि जास्त वाईट वाटतं. एखादा माणूस रस्त्यात कपडे फाडत असेल तर आपण समजू शकतो, पण त्याच्या कृत्याला टाळया वाजवणारा मॉब भेटला तर त्या वेड्यापेक्षा बघ्यांसाठी जास्त वाईट वाटावं असंच आहे हे!
अशा या प्रसारमाध्यमातल्या स्वयंघोषित तज्ज्ञांनी राजकारण्यांवर प्रचंड तोंडसुख घेतलं आणि झुंजीतली एक पार्टी बिथरली. राजकारण्यांच्या विरोधात काय करावं यासाठी बैठका घेणा-या वरीष्ठ पोलीस अधिका-यांना डोळे वटारून चूप केल्यानंतर ही नवीनच भानगड उपस्थित झाली होती. साहेब मुलाखत द्या, एकदातरी आमच्या चॅनेलला एक्सक्लुजिव बातमी द्या, जरा आमच्या स्टुडियोत येऊन स्पेशल मुलाखत द्या, आमच्या कार्यक्रमांसाठी अमुक हॉल द्या, त्याच्या परीसंवादात सामील व्हा, जरा कोट्यातलं घर बघा अशा विविध गोष्टींसाठी मागे लागणा-या आणि वरवर या प्रश्नांचं जनतेला उत्तर हवंय असं बोंबलत निर्भिड पत्रकारिता करणा-या पत्रकारांनी एकदम आमदारांना गुंड म्हणावं म्हणजे काय?
आता एका पार्टीला शिंगावर घेतलेलंच आहे तर फुरफुरलेल्या बाहुंनी राजकारण्यांनी या नव्यानं झुंजीत शिरलेल्या तिस-या संघालाही शिंगावर घेतलं, काही पत्रकारांविरोधात हक्कभंग आणून. आता हक्कभंगाचा ठराव आला आणि अगदी टोकाची कार्यवाही झाली तरी दोन-चार दिवस तुरुंगात ते ही ताठ मानेनं आणि टाळ्यांच्या गजरात या पलीकडे काहीही होणार नाही याची जाणीव असल्यानं तिस-या संघाचं मनोधैर्य खच्ची होण्याच्या ऐवजी त्यांना हुरुपच आला. एकेकाळी कुणी जर चारचौघात शिवी दिली तर अपमान वाटायचा. लोकं अशा अपमानानं आजारी पडायचे, त्यांचं मानसिक खच्चीकरण व्हायचं. काही मृदू ह्रदयाची माणसं तर अपमान सहन न झाल्यानं आत्महत्या करायची. पण आता आपण सगळेच इतके निबर झालोय की अपमान हा सहसा होतंच नाही. व समजा झालाच, तर स्वातंत्र्यसैनिकांच्या रुबाबात अपमानाच्या माळांचं रुपांतर फुलांच्या माळात करण्याची कला आपल्यापैकी अनेकांना साधली आहे. याची प्रचिती कलमाडी नावाचे सत्गृहस्थ तुरुंगातून सुटून पुण्याला आले त्यावेळी आपण घेतलीय. असं म्हणतात की, त्यांचं पुण्यात झालेलं स्वागत बघून पुण्याला आलेल्या एका विदेशी पर्यटकानं सांगितलं की ऑलिंपिकविजेत्या खेळाडुंचाही आमच्याकडे एवढा मोठा सत्कार होत नाही म्हणून!
आपल्याकडं असं वातावरण असल्यानं, पत्रकारांचा हिरमोड व्हायच्या ऐवजी त्यांना हुरुपच आला. हक्कभंग आणून आम्हाला फाशी दिलं तरी आम्ही तयार आहोत अशी हाळीच पत्रकारांनी दिली. आता आपल्याकडच्या कायद्यांनुसार दिल्ली गँगरेप व मर्डरकेसमधल्या मुख्य अल्पवयीन आरोपीलाही फाशी होणार नसल्यानं, मुंगी मारण्याच्या या गुन्ह्याला फाशी होणार नाही हे उघड आहे. पण याबाबतीत राजकारण्यांचं कसब पत्रकारांनीही कमावलंय हे मात्र खरंच. बांधावर बसलेल्या कॉमन मॅननं पुन्हा टाळ्या वाजवल्या. दोन बैलांची झुंज रंगात आलेली असताना सामना तिरंगी झाला होता आणि मजेची गॅरंटीच होती कारण मीडिया यात उतरल्यावर प्रसाराची कमतरताच राहणार नव्हती.
इथे ती इसापनीतीची गोष्ट वारंवार आठवत राहते, बेडकीण म्हणते बाळांनो, बैलांच्या झुंजीत जीव बेडकांनाच गमवावा लागतो, तेव्हा वेळीच मागे व्हा...
Monday, March 25, 2013
मारकुटे आमदार, मग्रुर पोलीस, उरबडवे पत्रकार आणि कॉमन मॅन

अशक्य कंटाळा
चारवेळा बेल वाजुनही माझे पाय हलले नाहीत, तेव्हा मला जाणवलं की मलाच नाही तर माझ्या पायांनाही प्रचंड कंटाळा आलाय हालचाल करण्याचा. शर्टाचं एक बटण खालीवर लागल्यावर ते नीट करायला लागणारा उत्साह हातातही नव्हता. मुळात कुठेच जायचं नसताना शर्ट तरी कशाला घातलास असा प्रश्नही मी हाताला विचारला. तर टोटल दुर्लक्ष करत हातानं माझा प्रश्नच उडवून लावला. माझाच हात माझंच ऐकत नाही म्हणजे काय? एकदा चांगले सिगारेटचे चटकेच देईन म्हणतो. पण जाऊ दे नंतर बर्नाल लावण्यासाठी दुस-या हाताकडेच याचना करावी लागेल. आज असा शरीराच्या एकेका अवयवामधून अशक्य कंटाळा का घरंगळतोय? त्यामुळं मनावरही मरगळ आलीय. आता मनावर आधी मरगळ आली, मग ती कांजण्यांसारखी शरीरावर पसरली की परिस्थितीपुढे शरण गेलेल्या शरीरानं मनाला नामोहरम केलं हे शोधायला हवं. खरंतर या मनाचा प्रॉब्लेमच वेगळा आहे. कंटाळा आल्यावर शरीर गपगार पडून आहे, डीपफ्रीजरमधल्या बीअरसारखं. पण सालं हे मन मात्र थंड का नाही होत? ते थांबतच नाहीये. मला एवढा प्रचंड कंटाळा आलाय आणि हे मन मात्र अथकपणे आतल्या आत उड्या मारतंय. या विचारावरुन त्या विचारावर, एका फांदीवरुन दुस-या फांदीवर उड्या मारणा-या माकडाप्रमाणं. यातून जरा सावरलो की या मनाचं काहीतरी करायला हवं. मला वाटेल तेव्हा विचार करेल नी मला वाटेल तेव्हा झोपच्या गोळ्या खाल्ल्यावर शरीर पडत तसं गप पडून राहील असं मन हवं. झोपेच्या गोळ्यांवरुन आठवलं. असाच एकदा अघोर कंटाळा आला होता, तेव्हा अर्धी बाटली झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. म्हटलं भानगडंच नको. या हाताबाहेर चाललेल्या मनाची आज खोडंच जिरवुया. आणि २२ तासांच्या प्रदीर्घ झोपेनंतर मी हॉस्पिटलमधल्या खाटेवर उठलो तेव्हा साक्षात्कारच झाला. झोपेच्या गोळ्यांनी माझ्यासकट माझ्या नखशिखांत शरीराला पार झोपवलं, पण सालं हे मन मात्र माझी खोड जिरवल्यासारखं सुरूच होतं. म्हटलं कमालच आहे. कसं शक्य आहे. तर डॉक्टर म्हणाले तुम्हाला मानसिक थकवा आला आहे. झोपेत तुम्ही फार बरळत होतात. मनावर खूप ताण असला की असं होतं. म्हटलं डॉक्टर कसं शक्य आहे. मला तर काहीच आठवत नाही. मला न कळता, मन कसं काय विचार करू शकेल? अहो, ते एक त्रांगडंच असतं. तुमची इच्छा असो वा नसो, सबकॉन्शस माइंडमध्ये विचारांचा मिक्सर सुरूच असतो. मला त्यानंतर मग कंटाळ्याचा अॅटॅकच आला. मग मला मानसोपचार तज्ज्ञाला वगैरे दाखवलं. त्यांनी मला आधी सोफ्यावर झोपवलं. मला वाटलं आता माझ्या अंगावर पांघरुण घालून बहुतेक गुणी बाळ असा... हे गाणं म्हणत हे मला झोपवणार की काय? पण नाही, बराचवेळ मी काय करतो, घरी कोण असतं, बालपण कुठे गेलं वगैरे विचारत बसले. मला नंतर नंतर वाटायला लागलं की माझ्या नोकरीचाच इंटरव्ह्यू सुरू आहे बहुतेक. आहे त्या ऑफिसमध्येच आपण जात नाहीयोत हे आठवल्यावर मग मला अजून कंटाळा आला नी मला नको ही नोकरी असं सांगून मी तिथून बाहेर पडलो.
त्या दिवशीइतकं नाही, पण आजही तसंच झालंय. झोपेच्या गोळ्या नाही खाणार आज. खूप पैसे जातात नंतर दवाखान्यात. परत नंतर त्या औषधाच्या गोळ्या बिळ्या गिळायच्या नी चारचौघांसमोर कुल्ल्यावर इंजेक्शन घ्यायची म्हणजे अतीच आहे. पँट नीचे करो असं रोज शंभर जणांना सांगायचा सिस्टरना कंटाळा कसा येत नाही त्याच जाणोत. तसेच पेशंट, तिच औषधं, तोच वास, त्याच खाटा फारच कंटाळवाणं आयुष्य आहे तिथलं. काय करावं या मनाचं, कसं करावं याला गप, तनानं-मनानं कसं बुडून जावं या कंटाळ्यात, याचाच विचार करतोय. ते सत्संग वगैरेची भानगड एकानं सांगितली होती. म्हणे मनावर संपूर्ण नियंत्रण मिळतं यांनी. मी विचारलं त्याला, मला मनसोक्त कंटाळा भोगायचाय, त्यात मनाची लुडबूड नकोय. तुझ्या त्या सत्संगाच्या क्रॅश कोर्सनी काम होईल का आधीच सांग. आळस मोडून एवढ्या लांब जा, तासभर प्रवचन ऐका आणि एवढं करून मनाचा उत्साह द्विगुणित झाला तर सगळ्यावर पाणीच ना! त्यावर त्या पठ्ठ्यानं नाही काही काळजी करू नकोस, बाबांकडे गेल्यावर कुणीही बरा होतो. एका माणसाला तीन वर्ष झोप येत नव्हती, बाबांना भेटल्यावर त्यांचा प्रसाद खाल्ल्यावर तो सलग तीन दिवस झोपला होता. म्हटलं चला. जरा कंटाळा झटकला आणि गेलो त्याच्याबरोबर. मोठं काहीतरी कमावण्यासाठी थोडं काहितरी आधी गमवावं लागतंच ना. म्हटलं झटकुया थोडा कंटाळा. तिथं गेलो नी फारच पस्तावलो. शेकडो लोकं आलेली सत्संगाला. गाणी काय म्हटत होती, टाळ्या काय वाजवत होती, फेर धरून नाचत काय होती. मी म्हटलं अरे कुठे आलो आपण? या सगळ्यांपासून सुटण्यासाठी तर मला कंटाळा हवाय. बघना किती ढोंगी माणसं आहेत ही. एकेकाच्या शरीरातून अंहंकाराचा दर्प आसमंतात दरवळतोय आणि ते त्या फोटोकडे बघत म्हणतायत तुझ्यापुढे मी क्षुद्र आहे म्हणून. तो बघितलास हातात तीन अंगठ्या घातलेला थोराड माणूस, तो म्हणतोय चांदी सोने रुपे आम्हा मृत्तिकेसमान! नी ती बाई बघितलीस... ती मोठ्ठं कुंकूवाली. माझ्या बाजुच्या इमारतीत राहते. ती समाजसेविका आहे म्हणे. पण तिने गेल्या तीन वर्षात एक रुपयाही पगार न वाढवल्यानं तिची मोलकरीण सोडून गेल्याची चर्चा ऐकलीय मी.
छ्या...सुखानं कंटाळा भोगता येईल, नी या मनाची लुडबूड थांबवता येईल अशी जागाच नाहीये कुठे. म्हणून मी ठरवलं की काही नाही घरातंच पडून राहुया. कितीही बेल वाजली तरी दारच नाही उघडायचं. पण अरे अरे दारावर धडका काय मारताहेत हे लोक. काही सभ्यताच नाही राहिलेली. असं कुणी दार उघडत नाही म्हणून काय दारावर लाथा मारायच्या. अरे तोडलंच की यांनी दार. आले एकामागोमाग आत भसाभस, धरण फुटलेल्या पाण्यासारखे. यांच्या काय बापाचं घर आहे का? आणि हे काय ओरडतायत? कशासाठी एवढा आरडाओरडा? पोलीस पोलीस काय बोंब मारताय, मी काय कुणाचा खून केलाय का? त्याच त्याच पलंगावर आडवं पडायचा कंटाळा आला म्हणून म्हटलं जरा पंख्याला लटकुया थोडा वेळ...
Subscribe to:
Comments (Atom)